Sunday, 9 October 2011

" या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे .."


नवी मुंबई, दि. ९ ऑक्टोबर, २०११:

मी आज खूप आनंदात आहे; प्रथमच मी मराठीत blogg लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे, आणि  आश्चर्य म्हणजे  चक्क जमतंय !  खूप अडचणी (९० %) केवळ काल्पनिक असतात. एकदा प्रत्यक्ष सुरवात आणि प्रामाणिक प्रयत्न केला कि अपेक्षित परिणाम मिळतोच. 
मी सध्या एका वेगळ्याच परिस्थितीतून जात आहे.   सर्वजण माझी आपुलकीने चौकशी करतात. आराम करण्याचा सल्ला देतात. ऑफिसमध्ये थोडाच वेळ देत असल्यामुळे जास्त वेळ कुटुंबासाठी, घरात देत आहे. पूर्वी वेळ कमी व कामे, जबाबदाऱ्या अनंत अशी अवस्था होती. आता वेळच वेळ व कामे नाहीच (म्हणजे, कामे इतरांनी वाटून घेतली आहेत).  स्टाफ,  भागीदार, नातेवाईक, मित्र मंडळी, कुटुंबीय या सर्वांचे  माझ्यावर इतके प्रेम आहे, कि माझी  कामे हातोहात सांभाळली जातात.    मला भेटण्यासाठी हल्ली खूप लोक येतात. मित्र, CA  मंडळी, नातेवाईक, अगत्याने येतात. एरव्ही हे लोक कधी  ( काही निमित्ताशिवाय ) आलेही नसते, पण या परिस्थितीत मात्र आवर्जून हजेरी लावतात. मलाही खूप आनंद वाटतो. 
आवडीच्या गोष्टींसाठी वेळ देता येतो हि किती आनंददायक बाब आहे. आवडीच्या CDs  ऐकणे, वाचन, फेस बुक, आणि आता हि नवीन आवड - blogg  लिहिणे. एकंदरीत काय आरामाच आराम चालू आहे.
पण मन अंतर्मुख झाल्यावर विचार येतात , असे किती काळ चालू राहील ? ऋणांचा बोजा वाढतच जाईल त्याची परत फेड कशी होईल ? पोटापाण्यासाठी हालचाल तर करावीच लागेल ? जास्त श्रम  न करता कमाई करण्यासाठी स्मार्ट काम करावे लागेल. नवीन मार्ग शोधावे लागेल.
मला कोणताहि आजार नाही; उलट जो दोष होता तो आता निघून गेला आहे. हात पाय शाबूत आहे, सर्वांचे - खास करून कुटुंबाचे -  संपूर्ण सहकार्य आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराजांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. मग मला कशाचीही भीती, काळजी करण्याचे कारण नाही.      " अहो पूर्व संचित होते म्हणुनी आम्हा लाभले नाथजी सत्यवाणी ".
संकटे जरी धाडली, तरी त्यातून बाहेर पाडण्यासाठी मार्गही दाखवितो. मग कशाला भविष्याची चिंता करीत बसू ? 
सबब, आयुष्य Full Throttle  enjoy  करण्याचे ठरविले आहे.
                                            " या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...."