दिनांक, ३ जानेवारी २०१२:
डिसेंबर उजाडला कि आगामी वर्षात काय बदल करायचे याचे विचार सुरु होतात. काहीतरी बदल करायचा, किंवा खूप रेंगाळलेली कामे मार्गी लावायची असा विचार व उद्योग सुरु होतात. गेल्या वर्ष अखेर 'आधार' कार्डाचे काम (Unique Identification Number ) मार्गी लावले. नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी वेगळ्या प्रकारे करावी असा विचार आला. सर्व विचारांती 'नव चंडी' हवन करावा असे ठरले. सर्वांच्या सहकार्याने दि. १ व २ जानेवारीला नव चंडी पाठ व हवन घरी विधिवत पार पडला. खर्च, वेळ, इ. पेक्षा सुद्धा महत्वाचे म्हणजे प्रबळ इच्छा असली कि सर्व गोष्टी मनासारख्या होत राहतात. कष्ट तर नक्कीच पडतात. खास करून होम मिनिस्टरला खूप जास्त मेहनत पडते. पण सर्व यथा सांग पार पडले कि मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय. सर्व गुरुजी, पाहुणे, नातेवाईक समाधानाने परतले कि मिळणारा आनंद हाच खरा 'श्रम परिहार'. ओढाताण सर्वांचीच असते, पण बिना तक्रार हे सांघिक कार्य परस्पर सहकार्याने पार पडले, कि झालेल्या कष्टाचे काहीच वाटत नाही.
'आनंदाचे डोही आनंद तरंगे ' अशी अवस्था आमची आहे. आत्मिक समाधान खरोखर केवळ अवर्णनीय आहे.
नव वर्षाची सुरुवात इतक्या सुंदर कार्यक्रमाने व्हावी हि अतिशय छान गोष्ट आहे. माझा मित्र नेहमी म्हणतो कि देवाला जर आपण भागीदार केले तर कार्याचा भार, खास करून त्यातील जोखीम (Risk), कमी होते व आपल्याला अधिक बळ प्राप्त होते. मला त्याचे म्हणणे पटते. कोणत्याही कार्यारंभी आपण देवाची प्रार्थना करतो, म्हणजे एक प्रकारे देवाला साक्षी / भागीदार करण्याचाच प्रकार झाला; नाही का ?
हे आहे काही फोटो, त्या क्षणांचे साक्षीदार !
No comments:
Post a Comment