Tuesday, 28 February 2012

" वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी.."


नवी मुंबई , दि. २७-०२-२०१२.
घरचा बगीचा हे स्वप्न आम्ही दोघांनी  फार पूर्वीपासून पहिले होते. खर तर खारघर चे घर वर्ष  २००० मध्ये घेतल्यापासूनच हे स्वप्न पाहिले होते. ४०० चौ. फुटाची गच्ची पाहिल्यावर आम्ही या घराच्या प्रेमातच पडलो.  काही लोकांनी वेड्यात काढले,  कि  गच्ची पेक्षा 3BHK Flat  फायदेशीर झाला  असता.  पण याबाबत मी व गीतांजली आमचे  एकमत आहे  व  गच्ची हा आमच्या दृष्टीने एक  strong  point आहे.   सुंदर बगीच्याचे  स्वप्न  तेंव्हापासूनच  रुजले होते. गीतांजलीला फुल, झाडे, कुंड्या, इ. गोष्टींची मनापासून आवड. तीने मनापासून फुलझाडे लावली व बाग तयार केली.
बागेची मशागत करणे हे  तस बघाल तर  फार तापदायक  काम आहे.  आवडीचे काम असल्यामुळे गीतांजली मनापासून देखभाल करते.  मी अधूनमधून लक्ष देतो.   मधल्या काळात माझ्या तब्येतीमुळे , तसेच  इतर कारणांमुळे म्हणावे तितके लक्ष दिले गेले नाही.
माझ्या एका CA Friend ने, माझ्या heart  problem बद्दल कळल्यावर, मला बाग काम करणे हा heart साठी  उत्तम उपाय आहे,  हे सांगितले. त्यात मला  बागकामाची आवड आहे, आणि घरी मोठी गच्ची आहे हे  कळल्यावर तर  अगत्याने  पंच गणीहून पुदिना, टमाटे, वांगी, चेरी टमाटे, इ. रोपे   आणून दिले.  काही आठवडयापूर्वी प्रदर्शनातून माती, खते, हत्यारे,  इ. आणून पडल्या होत्या.  शेवटी,   कालचा  रविवार   आम्ही, अगदी  ठरवून पूर्ण दिवस बागकामासाठी द्यायचा  ठरविले.
सकाळी ९.०० वाजल्यापासून चहा,  नाश्ता  करून जे  कामाला  भिडलो, ते संध्याकाळी जवळ जवळ ५.०० वाजेपर्यंत,   केवळ बागकाम एके बागकाम केले. मधे केवळ एक छोटा कॉफी ब्रेक. जेवणसुद्धा नाही !  जुन्या कुंडीतील माती इतकी घट्ट,  कि खूप प्रयासाने व वेळाने रिकामी करता आली. कुंड्या वर खाली करणे,  खुरपणे, पाळेमुळे खणून साफ करणे, खते, माती कालवणे, रोपटी लावणे,   असा भरपूर व्यायाम झाला. हात चांगलेच  सोलुन निघाले. मला वाटले नव्हते कि बागकाम  इतका वेळखाऊ  व कष्ट दायक  असेल म्हणून. पण हे काम खूप आनंददायक आहे यात मात्र शंका नाही.  तहानलेल्या  मातीवर पाणी टाकल्यावर येणारा वास, अक्षरशः वेड लावणारा असतो.  प्रत्येक झाड तृप्त होऊन डोलत  जसे कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांना डोलतांना पाहून आपले मन प्रसन्न होते व त्यामुळे कष्टाचे काहीच वाटत नाही.  एक फार छान अनुभव असा आला, कि झाडे तुमच्याशी चक्क संवाद साधतात ! तृप्त झालेल्या बगीच्यावरून एक नजर फिरवा. ज्या फांदीकडे पहाल ती डोलायला लागते ! जणू ती तुम्हाला  "thank  you !" म्हणते आहे.  घरात छोटी बाळे, किंवा पेट्स  असतात,  त्यांच्याशी तुमचा संवाद हा शब्दांच्या पलीकडला असतो. तसेच झाडांशी साधलेला संवाद हा शब्दातीत आहे व तो केवळ अनुभवानेच  घेण्याची गोष्ट आहे.  तृप्त झाडे पाहून इतके प्रचंड समाधान मिळाले कि CA  Friend चा सल्ला एकदम पटला, आवडला. तुम्ही पण हा आनंद कधी घेऊन पहा !













No comments:

Post a Comment