माझी शिकागो ट्रीप :
दि. ४ मे २०१८ : डॅलसच्या DFW विमानतळावरून संध्याकाळी ७.४० वाजता स्पिरिट एयरलाइन्सच्या विमानाने शिकागोच्या दिशेने उड्डाण केले, आणि जीव भांड्यात पडला. कारण असं होतं, कि ५ वाजताचे विमान पकडण्यासाठी आम्ही वेळेत उबर केली; पण वाटेतच कळले कि थंडरस्ट्रॉम मुळे शिकागोची सर्व उड्डाणे विलंबित / रद्द झाली, म्हणून धाकधूक वाटत होती. त्यामुळे तीन साडेतीन तास वाट पाहत बसून राहावे लागले तरी शेवटी एकदाचे आमचे विमान सुटले म्हटल्यावर जीवात जीव आला.
१२८८ कि.मी. चा प्रवास पावणेतीन तासात करून, १०.३० ला शिकागोला उतरलो तेंव्हा पाऊस थांबला होता पण टार मॅक वर दिसणाऱ्या नियॉन साईन्सची रंगीत प्रतिबिंबे, रस्ते व धावपट्टी ओली आहे, हे दर्शवित होती. उबर कॉल करून डाऊन टाऊन मधे असलेल्या हॉटेल फेलिक्सच्या दिशेने रवाना झालो. टॅक्सी ७० मैलापेक्षा जास्त वेगात धावत होती, पण त्यापेक्षाहि जास्त वेगात, स्वप्ननगरी शिकागोबद्द्लची चित्रफीत मनात दौडत होती. रस्त्याला समांतर रेल्वे ट्रॅक, व आपल्या मरीन लाईन्स, चर्नी रोड सारखी स्टेशन्स पाहून मजा वाटत होती. मनात आले कि, एकदातरी या ट्रेन ने प्रवास करायलाच हवा. हॉटेलच्या जरा अलीकडेच, एका पिझ्झा रेस्टॉरंट जवळ टॅक्सी सोडून दिली. अद्वैत म्हणाला कि शिकागो चा स्पेशल असा 'डीप डिश पिझ्झा' खायलाच पाहिजे. जाड जुड अश्या चविष्ट पिझ्झ्याने पोट गच्चं भरले. नंतर चालतच हॉटेल फेलिक्सला गेलो, तेंव्हा १२.३० वाजून गेले होते.
दुसऱ्या दिवशी पाऊस नसला तरी जरा थंडी होती. प्रथम गाठले शेड्स ऍक्वेरियम. 'सिटीपास' आधीपासून काढून ठेवलेले असल्याने सर्व ठिकाणी तिकिटासाठी, आमच्यासाठी रांग नव्हती; काही ठिकाणी तर प्रायोरिटी एन्ट्री होती. तारापोरवाला मत्स्यालय व या शेड्स मत्स्यालय याची तुलनाच करता येत नाही. ५ दशलक्ष US गॅलन इतक्या क्षमतेचे माशांसाठी टँक्स. बेलुगा व्हेल्स, क्वानिक, व अनेक असंख्य जाती /प्रजाती, कि अभ्यासक तर वेडेच होतील. मजा याची वाटली कि खूप शाळकरी छोटी मुले, त्याच्या टीचर बरॊबर, हातात वही पेन्सिल घेऊन, काही नोंदी करत होती. अशा होम वर्कचा कोणाला कंटाळा येईल ? शार्कवर एक ४डी फिल्म पहिली. पॅसिफिक समुद्रातील व्हाईट साईडेड डॉल्फिन्सचे हे ऍक्वेरियम घर आहे असे म्हणतात, पण मला काही कुठे दिसला नाही.
नंतर पोहचलो 'अड्लर प्लॅनेटरियम' बघायला. डोम थिएटर मध्ये अवकाश दर्शनावर एक सुंदर फिल्म दाखविली. ३६० अंशाचा प्रचण्ड स्क्रीन (आकाशच!) वेगवेगळी नक्षत्रे, तारे या बद्दल सुंदर माहिती मिळत होती. दुसरी फिल्म प्लूटोबद्दल, त्याचे 'ग्रहपद' का काढले वगैरे , अशी उदबोधक माहिती देत होते. गंमत अशी कि अति reclined खुर्च्या , काळोख , एयर कंडिशन्ड अशा माहोलमध्ये, जर ब्रह्मानंदी टाळी नाही लागली, तरच नवल ! तात्पर्य, खूप जण सहज समाधीचा आनंद घेत होते ! [ मी जागाच होतो, विचारा पाहिजे तर...]. बाहेर आल्यावर, मिशिगन तलावाच्या काठावर फेरफटका मारला. तलाव इतका प्रचण्ड आहे, कि समुद्रच आहे असे प्रथमदर्शनी वाटते. निळंशार पाणी व लाटांचा अभाव यामुळे तलाव आहे हे लक्षात येते.
नंतर परत एकदा उबरने मिलेनियम पार्कला गेलो. सहस्रकाच्या (वर्ष २०००) स्वागतासाठी एक बीन (शेंग ?) च्या आकाराचा मोठा मॉन्युमेंट. अत्यंत चकचकीत. सर अनिश मिखाईल कपूर या (मुंबईत जन्मलेल्या ) ब्रिटिश शिल्पकाराची ही संकल्पना.
स्टारबक्समधे चायलाटे घेऊन चालत आम्ही पोहचलो साऊथ मिशिगन अव्हेन्यू येथे. आर्ट इन्स्टिटयूट समोरील या रस्त्याचे सन्मानार्थ नाव "स्वामी विवेकानंद वे" असे ठेवण्यात आले आहे. अत्यंत अभिमान वाटला. ९/११ चा आजकल एकच अर्थ काढला जातो, तो म्हणजे ट्विन टॉवर वरील दहशतवादी हल्ला. स्वामी विवेकानंदांचे शिकागोतील धर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषण सुद्धा ९/११ ला (११-९-१८९३) झाले होते. मला मोदीजींचे शब्द आठवले, "There is one 9/11 (of 1893) where Vivekananda worked hard to flourish the Country, on the other hand, we saw the 21st century 9/11 that destroyed humanity".
तेथून पुढे गेलो नेव्ही पियर वर. नेव्ही पियर (आपला भाऊचा धक्का हो !) हा मिशीगन तलावाच्या शिकागो किनारपट्टीवर ३३०० फूट लांबीचा धक्का आहे. तिथेच एक उंचच उंच जायंट व्हील आहे. त्याला ४२ बंदिस्त पाळणे आहेत. प्रत्येक पाळण्यात ४ - ८ जण बसु शकतात. आम्हीही त्यात १५ मिनिटाची (३ राऊंड्स) राईड घेतली. बंदिस्त व हळु फिरत असल्याने भीती वाटत नव्हती. शिकागोचा वरून एरियल व्ह्यू घेतला.
नंतर पुढील आकर्षण होते, ८७५ नॉर्थ मिशीगन अव्हेन्यू (पूर्वीचे जॉन हँकॉक सेन्टर ), अर्थात ३६० शिकागो ऑबझर्व्हेशन डेक. वेगवान लिफ्ट (ताशी २० मैल ) ने एक हजार तीस फूट उंचीवर (३१४ मीटर्स ) ९४ व्या मजल्यावर एका मिनिटाच्या आत पोहचवले. वरून ३६० अंशातून दिसणारा नेत्रदीपक नजारा म्हणजे केवळ अप्रतिम ! सर्व बाजूंनी मैलोन्मैल पसरलेल्या, रोषणाईने उजळलेल्या उत्तुंग इमारतींचे जाळे असेच शिकागोचे वर्णन करावे लागेल. किती बघु, अन काय काय बघु ! काय काय नजरेत सामावून घेऊ, असं झालं. अतिशय हरखून गेलो, हा '' याची देही याची डोळा '' अनुभवावरून. पाय निघत नव्हता. गम्मत म्हणजे " पुढे चला, आटपा आता लवकर " असे म्हणायला कोणी नव्हते. मनसोक्त स्वर्गीय आनंद घेऊन, खाली 'चीज फॅक्टरी ' नावाच्या हॉटेलमध्ये पास्ता खाऊन परतलो.

Statue of Copernicus |

दुसऱ्या दिवशी स्वच्छ ऊन व हवा पण छानच होती. (शिकागोला विंडी सिटी असेही नाव आहे ). डंकिन डोनट चा नाश्ता करून, विलीस टॉवर ( पूर्वीची सीएर्स टॉवर ) वरील स्काय डेक बघायला निघालो. विलिस टॉवर हि १४५० फूट , अमेरिकेतील दुसरी सर्वात उंच बिल्डिंग. लिफ्टने १३५३ फूट ( ४१२ मीटर्स ) उंच, गेल्यावर , १०३ व्या मजल्यावरून शिकागो शहराचा दिवसाउजेडीचा नजारा बघायची संधी मिळाली. २०१४ मधे एम्पायर स्टेट बिल्डिंग च्या ८६ व्या मजल्यावर गेलो होतो. काल हँकॉक टॉवरच्या ९४ व्या मजल्यावर व आज विलीस टॉवरच्या १०३ व्या मजल्यावर ! काल रात्रीचे उजळलेले शिकागो दर्शन तर आज सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात केवळ शिकागो शहरच नव्हे तर अमेरिकेतील चार राज्य बघत होतो ! इलिनॉईस, इंडियाना, विस्कॉसिन व मिशीगन. व्हिसिबिलीटी ६५ ते ८० कि.मी. आहे, असे समजले. पूर्वेला समुद्रासारखा दिसणारा मिशीगन तलाव, दक्षिणेला नेव्ही पिअर (जायंट व्हील मुळे लगेच ओळखता येतो ). उत्तर व पश्चिमेला पसरलेल्या असंख्य गगनचुम्बी इमारतींचे जाळे. सर्वत्र इतक्या स्काय-क्रॅपर्स असूनही आपल्यापुढे सर्व खुज्याच ! या बिल्डिंगचा Sway, ६ इंचेस इतका आहे ( म्हणजे, वाऱ्याच्या जोरामुळे ती, ६ इंच डुलते/ हलते !) घाबरू नका, तीन फुटापर्यंत हलण्यासाठी यात तरतूद केली आहे. हे दृश्य विलक्षण होते पण खरा "थरार " तर अजून पुढेच आहे. काचेच्या बंद बालकनीत, ज्याचा तळ व छत सुद्धा काचेचेच आहे, त्यामध्ये आपण उभे असतो तेंव्हा, तुमचा " व्हर्टिगो " टेस्ट होतो. काचेतून १३५३ फूट खालील रस्ते व वाहने पहिली कि थरकाप उडतो ! खूपच विलक्षण असा अनुभव होता. मनसोक्त स्काय डेकचा आनंद घेतला व वरून विहंगम दृश्य बघून समाधानाने परतलो.
"चिपोटले " मधे बरिटो बाउल खाऊन नंतर गेलो "फिल्ड म्युझियम" बघायला. अपेक्षेप्रमाणे, म्युझियम खुप मोठे आहे. जवळ जवळ दोन तास होते; त्यात डिनोसौरस वर माहितीपूर्ण अशी एक ४डी फिल्म पहिली. चीनचा इतिहास, ममीज, wilderness, जीवाश्म, डिनॉसॉर्स चे मोठाले सांगाडे , व असे अनेक माहितीपूर्ण दालनातून फिरलो. ४ वाजता म्युझिअम बंद होते, तेंव्हा बाहेर पडलो. पायपीट खूप झाली होती. मोठाल्या पायऱ्यांवर बसून थोडी विश्रांती घेतली ( आपल्या एशियाटिक सोसायटी सारखे खांब व पायऱ्या होत्या ).
Columbus Statue |
चालत आम्ही गेलो "रुझवेल्ट" स्टेशनवर, ट्रेन पकडून "ओ हेअर " च्या दिशेने रवाना झालो. गर्दी जास्त नव्हती; बसायला आरामात मिळाले. आपल्या लोकल प्रवासासारखाच हा प्रवास, पण दारे बंद झाल्यावर गाडी सुटायची. कधी भुयारी तर कधी जमिनीवरून असा मजेत प्रवास चालला होता. येणाऱ्या स्टेशनचे नाव, दरवाजे कोणत्या बाजूचे उघडणार (म्हणजे स्टेशन कोणत्या बाजूला येणार आहे), याची घोषणा वेळोवेळी होत होती. फलाट व ट्रेनचा दरवाजा यांची लेव्हल सेमच होती. "ओ हेअर" शेवटचे स्टेशन. तेथून काही मिनिटात विमानतळावर पोहचलो. किऑस्कवरुन बोर्डिंग पासेस काढून फूड कोर्टकडे गेलो. चायनीज जेवण करून अमेरिकन एअर लाईन्सचे परतीचे विमान पकडण्यासाठी गेटकडे रवाना झालो. विमानात डोळे मिटून स्वप्नवत अशा स्वप्ननगरी शिकागोच्या ताज्या अनुभवांची मालिका बघता बघता कधी डॅलसला पोहोचलो , ते कळलेच नाही.
शिकागो ट्रिप अशारितीने विविधतापूर्ण, अनोखी, अतिशय आनंददायी झाली. हे सुखद क्षण आठवणींच्या कप्प्यात कायमचे कोरलेले राहतील.