मलेशिया - सिंगापूर ट्रिप :
खूप दिवसांपासून नुसतेच ठरवत होतो, ते मनोरथ एकदाचे वास्तवात आले आणि मलेशिया -सिंगापूर ट्रीप चा बेत ठरला. शरदने पुढाकार घेतल्याने सिंगापूर ट्रीप चा आराखडा तयार झाला नंतर प्रशांतपण सामील झाल्याने सहा जणांचा ग्रुप तयार झाला. ग्रुप मधे जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
पहिला टप्पा मुंबई - श्रीलंका- क्वाला लंपूर असा प्रवास होता. क्वाला लंपूरला जरी सकाळी साडेदहाला पोहोचलो तरी हॉटेल चेक इन दुपारी असल्याने आम्ही विमानतळावर घेतलेल्या टॅक्सिने थोडे फिरायचे ठरविले. नॅशनल मॉस्क, म्युझियम, अशी काही स्थळे पाहिली.
पेट्रोनास ट्वीन टॉवर्स : आम्ही संध्याकाळी सव्वा सहा वाजताची वेळ मुद्दामच घेतली होती. दिवसाचा, रात्रीचा, तसेच सूर्यास्ताचा देखावा बघण्यास मिळावा हा उद्देश. ८६ व्या मजल्यावरून (१२३० फुटांवरून) जे विहंगम दृष्य बघायला मिळाले, ते केवळ अप्रतिम. पेट्रोनासच्या वर आहे विलीस टॉवर (शिकागो), जो आहे १४५० फूट उंच व १०३ मजले ; जो बघण्याचा योग पण याच वर्षी मे महिन्यात आला होता.
बाटु केव्हस : प्रामुख्याने मुस्लिम असलेल्या या देशातील हे एक हिंदू मंदिर. तामिळी लोकांचा देव मुरुगन याचा भव्य १४० फुटी उभा पुतळा हे येथील वैशिष्ठ. तसेच २७२ पायऱ्या चढून मोठ्या गुहा चुन्याच्या (lime stone caves) असून त्या ४०० दशलक्ष वर्षे जुन्या आहेत असे कळले.
गेंटिंग हायलँड :
Resorts World Genting ( RWG ) (जुने नाव : गेंटिंग हायलँड ) हे क्वाला लंपूर पासून ३५ कि.मी. वर माऊंट उलु काली (१८०० मीटर्स उंचीवर) इंटिग्रेटेड हिल रिसॉर्ट आहे. हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, थीम पार्क्स आणि कॅसिनो यांची रेलचेल. पण प्रमुख आकर्षण रोप वेज.
"दिलका भंवर करे पुकार ... " शरदच्या आवाजात चिनी मंदिर टॉवर वर. |
जेवणाची काय व्यवस्था आहे, याचा शोध घेताहेत |
सिंगापूरला प्रयाण |
चांगी आंतरराष्टीय विमानतळावर आगमन |
जुरांग बर्ड पार्क :
व्हर्टिकल गार्डन्स , मरिना बे सँड्स :
सिंगापूर फ्लायर :
हा एक सुंदर अनुभव आहे. भीती अजिबात नाही. अतिशय संथ गती (२८ मिनिटे एका राऊंडला ) असल्याने व बंदिस्त असल्याने भीतीचे कारणच राहात नाही. १६५ मीटर्स जमिनीच्यावर असल्याने जायंट व्हील वरून अप्रतिम दृष्य दिसते.
सेंटोसा आयलंड :
"सेंटोसा " हे नाव संस्कृत शब्द "संतोष " वरून आले आहे.
सिंगापूरमधील बसचा सुखद प्रवास |
परतीच्या प्रवासासाठी सज्ज |